वाद विवाद स्पर्धेमध्ये सोलापूर पोलीसांची बाजी
वाद विवाद स्पर्धेमध्ये सोलापूर पोलीसांची बाजी
स्पीड न्यूज २४ वृत्तसेवा : Friday, 10 Nov, 2023
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय वाद-विवाद स्पर्धेमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीसांनी बाजी मारली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पोलीस हवालदार अभिजित अभिमन्यु गोटे (सोलापूर ग्रामीण), द्वित्तीय क्रमांक पोलीस उपनिरीक्षक विनोद व्यंकटराव धुर्वे (पुणे ग्रामीण), तृत्तीय क्रमांक पोलीस नाईक श्रीमती अश्वीनी गणपत गोटे (सोलापूर ग्रामीण), उत्तेजनार्थ सहायक पोलीस निरीक्षक धनाजी बाळासाहेब पाटील (सांगली) आदी विजयाचे मानकरी ठरले. या सर्वांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मार्गदर्शक तत्वांनुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये मानवी हक्कांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर परिक्षेत्रीय स्तरावर सामान्य नागरिकांशी नियमित संबध ठेवताना पोलीसांकडून त्यांच्या मानव अधिकारांचे उल्लंघन का होते? त्याचे परिणाम कशाप्रकारे कमी करु शकतो या विषयावर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण मधील १४ पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी भाग घेतला होता.
मानवी हक्क या विषयावरील अभ्यासक तज्ज्ञ डॉ. अॅड. संतोष शहा, प्राचार्य राजेंद्र पोंदे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, कल्पना खामकर, अनिल शिरोळे, पोलीस कल्याण विभागाचे सुनिल जांभळे, अरुण कुसाळे आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन कविता पाटील यांनी केले.